इतिहास खरे तर सक्षमीकरणाचे, उन्नतीचे आणि सुधारणांचे ‘हत्यार’ असायला हवे; पण हल्ली आपण त्याच्याकडे ‘बंदिवासाचे साधन’ म्हणून बघतो आहोत!

टोकाच्या भूमिका घेणाऱ्यांनी संवादाची सर्व दारे प्रदूषित केलेली आहेत. त्यांनी समाजात त्यांच्या विचारांना वाढता पाठिंबा मिळेल, अशी पार्श्वभूमी तयार करून ठेवलीय. आसपासचा सर्व ‘प्राणवायू’ ताब्यात घेत त्यांनी बहुसंख्याकांना भयभीत करून ठेवले आहे. आता असहिष्णुता आणि दंभाच्या विरुद्ध आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे. ‘मुकी बिचारी कोणीही हाका’ ही प्रवृत्ती सोडून न पटणाऱ्या सगळ्या धोरणांविरुद्ध बोलण्याची हीच वेळ आहे.......